दिग्विजय सिंगांविरोधात साध्वी प्रज्ञासिंह रिंगणात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |



भोपाळ : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने साध्वी प्रज्ञा यांना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले आहे. इथे त्यांचा सामना काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांच्याशी होणार आहे.

 

भाजपने बुधवारी मध्य प्रदेशातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह, गुणा येथून के. पी. यादव, सागर येथून राज बहादूर सिंग, विदिशातून रमाकांत भार्गव यांनी तिकीट दिले आहे. दरम्यान, भोपाळमधून उमेदवारी जाहिर केल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, “आम्ही निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत आणि प्रचाराच्या कामात सध्या गुंतलेले आहोत.”

 

दरम्यान, भोपाळमधून काँग्रेसने ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि दिग्विजय सिंह यांना परस्परांचे कट्टर विरोधक मानले जातात. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक केल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी ‘हिंदू दहशतवादा’च्या नावाखाली त्यांच्यावर केली होती. आता हे दोन्ही विरोधक समोरसमोर अल्याने यंदाची भोपाळमधील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

 

तत्पूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भाजपत प्रवेश करतेवेळी सांगितले की, “मी निवडणूक लढणार आणि जिंकणारही. मला शिवराज सिंह यांचा पाठिंबा आहे.” साध्वी यांनी यावेळी दिग्विजय यांच्यावरही हल्ला चढवला. ‘’शत्रूचा पराभव करण्यासाठी मी पूर्ण सज्ज आहे. मला सध्या अनेक आरोग्यविषयक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दिग्विजय सिंह हेच त्याला जबाबदार आहेत. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यावर जे डाग लागले आहेत, ते मी कधीच विसरू शकत नाही,” असेही त्या म्हणाल्या.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@