'पीएम मोदी' चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवरून गायब?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |



मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर युट्युबवरून काढून टाकण्यात आले आहेत. यापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित करण्याला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकांमुळे आयोगाने हा निर्णय घेतला आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' ऑफिशियल ट्रेलर असे युट्यूबवर सर्च केल्यावर व्हिडिओ उपलब्ध नाही असा मजकूर दिसतो. त्यामुळे, निवडणूक आयोगाने प्रदर्शनावर दिलेल्या स्थगितीच्या निर्णयामुळे हा ट्रेलर सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे.

 

२९ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे सदर चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे हा चित्रपट आता ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, निवडणुकीच्या काळात चित्रपट प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल, त्यामुळे निवडणूक आयोगाने 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याचा निर्णय घेतला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@