आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त एनसीपीएकडून ‘मुद्रा डान्स फेस्टीवल’ चे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |


 

मुंबई : आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त एनसीपीए आयोजित करत असलेल्या मुद्रा डान्स फेस्टीवलचे यंदा ८ वे वर्ष आहे. यावर्षीच्या फेस्टीवलमध्ये नृत्याच्या भाषेतून हास्य थीमच्या माध्यमातून हास्यरंगाच्या विविध छटा सादर केल्या जाणार आहेत. या वर्षीचा फेस्टीवल २१ , २५ आणि २७ एप्रिल रोजी एनसीपीएमध्ये आयोजित केला जाणार आहे.

 

फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी २१ एप्रिलला व्ही. पी. धनंजयन आणि शांता धनंजयन यांच्याकडून भरतनाट्यम आणि मल्टी डान्स स्टाईलचे सादरीकरण करण्यात येईल. आपल्या सादरीकरणात ते हास्यम शुर्पणखामुखीचा समावेश करतील. हा कला प्रकार म्हणजे रामायणातील एक प्रसंग आहे (तुलसीदास रामायण-हिंदी). या प्रसंगामध्ये रावणाची बहिण जंगलात श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यासमोर येते. या प्रसंगात शुर्पणखेचे पात्र व्ही. पी. धनंजयन हे सादर करणार आहेत. त्यानंतर कनक रेळे आणि ग्रुप ओडीसी, मोहिनीअट्टम आणि भरतनाट्यमच्या माध्यमातून नृत्यशास्त्रीक परंपरा सादर करतील.

 

त्यानंतर २५ एप्रिल रोजी राज्यसभेतील खासदार आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या नृत्यांगना डॉ. सोनल मानसिंग भरतनाट्यमचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर संगीत नाटक पुरस्कार विजेत्या मंदाकिनी त्रिवेदी मोहिनीअट्टम सादर करतील.

 

फेस्टिवलच्या पुढील भागात म्हणजे २७ एप्रिल रोजी मुद्रा डान्स फेस्टीवलचा समारोप प्रियदर्शनी गोविंद आणि सदानाम बाळकृष्णन यांच्या अंतिम कला प्रदर्शनाने करण्यात येईल. प्रियदर्शनी गोविंद हे भरतनाट्यम तज्ञ हसती हे नृत्य सादर करतील. फेस्टीवलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंग्लिश सबटायटल्ससह सदानाम बाळकृष्णन यांचे कथकली सादरीकरण. यामध्ये रावणाच्या बालपणीचे प्रसंग सादर करण्यात आले आहेत. यात रावणाचे त्याचे भाऊ कुंभकर्ण आणि बिभीषण यांच्याशी संभाषणाचा समावेश आहे.

 
 
 

तसेच फेस्टीवलच्या शेवटच्या दिवशी टाटा थिएटर फोयरमध्ये प्रसिध्द विद्वान डॉ. मालती अग्नेस्वरन यांच्या नृत्यकलेत हास्याचा सहभाग या विशेष सत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@