नाना पटोलेंवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |



नागपूर : काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची जिल्हा प्रशासनाकडून तक्रार करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल चुकीची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केल्याप्रकरणी ही तक्रार केली आहे. न्यायालयाच्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता स्वत:च्या व्टिटर अकाउंटवर दिशाभूल करणारा मजकुर अपलोड करण्याचा प्रकार नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या अंगलट येणार असे दिसत आहे.

 

नाना पटोलेंविरुद्ध नायब तहसीलदार स्रेहल ढोके यांनी सदर पोलीस ठाण्यात आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. सोमवारी रात्री त्यांनी दिलेल्या तक्रारीची माहिती कळताच राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सरपंच भवनातील ईव्हीएम मशिनची एफएलसी तपासणी सुरू असल्यामुळे २५ ते २८ मार्च दरम्यान स्ट्राँग रूम मध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नव्हते. त्यामुळे पटोलेंनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती.

 

या संबंधाने न्यायालयाने ६ एप्रिलला दिलेल्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता पटोलेंनी त्यांच्या व्टिटर अकाउंटवर ७ एप्रिलला "ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमचे फुटेज पटोलेंना द्या, न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश, आम्ही नागपूरकरांसाठी लढा लढल्याशिवाय राहणार नाही. हे दाखवून दिले. निवडणूक खुली व निष्पक्ष झालीच पाहिजे." असे संदेश प्रसारित केले होते. या संबंधाने एमसीएमसी कमिटीत चर्चा झाली आणि पटोलेंना खुलासाही मागण्यात आला होता. त्यांच्याकडून आलेला खुलासा लक्षात घेता त्यांनी निवडणूकीवर गैरवाजवी प्रभुत्व पाडल्याचे अर्थात आचार संहितेचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षात नोडल अधिका-यांनी पटोलेंविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@