प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचा भाजपाला पाठिंबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |


 

 

जामनगर : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपच्या कमळ चिन्हासह आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. या ट्विटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले असून त्याने त्याच्या पत्नीचा हॅशटॅग वापरला आहे. जडेजाच्या पाठिंब्यानंतर पंतप्रधानांनी त्याचे ट्विट रिट्विट करत आभार मानत विश्वचषकासाठी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

 

इंग्लंड येथे होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या तीन तासात आपण भाजपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. यामागे त्याच्या घरातील कौटुंबिक कलहाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह आणि बहीण नैना जडेजा यांनी कालावाड येथील सभेत काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला होता तर जडेजाची बायको रिवाबा हिने यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे जडेजाच्या घरात राजकीय मतभेत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

  
 
 

जडेजाची पत्नी रिवाबा ही जामनगर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होती असेही सांगण्यात येत आहे. मात्र, येथील विद्यमान खासदार पूनम माडम यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आल्याने रिवाबाला धक्का बसला पण तिने पूनम यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, यापूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@