असे आहे 'भारत' चे नवीन पोस्टर ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |



 

मुंबई : सलमान खान आणि कतरीना, तब्बू, दिशा पटनी, जॅकी श्रॉफ यांची जबरदस्त स्टारकास्ट घेऊन आपल्या भेटीला येणाऱ्या भारत या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर आज प्रदर्शित झाले आहे. आजच्या या नवीन पोस्टमध्ये सलमानचा रेट्रो लूक दिसून येत आहे. कालच्या २०१० सालच्या लुकपेक्षा हे पोस्टर अधिकच आकर्षक दिसत आहे. हे दोन्ही लूक पाहिल्यानंतर चाहते आता या चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रतीक्षेत आहेत.
 
 
 
 

कालच भारतचे एक पोस्टर प्रेक्षकांच्या समोर आले त्यातील सलमान खानच्या इंटेन्स लुकला नेटकऱ्यांची तसेच बॉलिवूड जगतातील अनेक कलाकारांची पसंती मिळाली. सुनील शेट्टी, अनिल कपूर अशा अनेक दिग्गज कलाकारांनी चित्रपटाला प्रोत्साहनपर ट्विट केले आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत या चित्रपटाला विशाल शेखर या प्रसिद्ध जोडगोळीने संगीत दिले आहे. त्यामुळे तो ही एक आकर्षणाचा बिंदू या चित्रपटामध्ये आहे.

 

येत्या ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सलमान खान बॉक्स ऑफिसवर स्वतःचेच रेकॉर्ड ब्रेक करेल का? हे आता लवकरच कळेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@