आर्ची म्हणत्ये एकदा जीव लावला की मरेपर्यंत...!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |

 

झिंगाट फेम रिंकू राजगुरूचा 'कागर' हा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे. त्या आधी नुकताच त्याचा ट्रेलर वायकॉम १८ ने युट्युबच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणला. 
 

 

 
राजकारणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेमाची किनार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी धडपडणाऱ्या एका तरुणाची गोष्ट देखील या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं ! असे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाला सांगायचे आहे.
 

रिंगण या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते मकरंद माने यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. तसंच रिंकू राजगुरूच्या झिंगाट यशानंतर हा तिचा पहिला चित्रपट असल्यामुळे सर्व चाहत्यांची नजर तिच्या अभिनयाकडे असणार आहे. त्याचबरोबर शशांक शेंडे आणि शुभंकर तावडे हे देखील चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत.

 
 

हा चित्रपट आधी १४ एप्रिल ला प्रदर्शित होणार होता मात्र काही कारणास्तव हा चित्रपट नियोजित वेळी प्रदर्शित होऊ शकता नाही मात्र आता येत्या २६ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@