होय, नक्षलवाद्यांशी माझा संबंध होता; गौतम नवलखा यांचा खुलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |



 

मुंबई : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आपले नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे मान्य केले आहे. नवलखा यांनी सोमवारी उच्च न्यायालयात आपली बाजू मांडली. त्यावेळी, माझे नक्षलवाद्यांशी संबंध होते पण हे संबंध फक्त माझ्या अभ्यासासाठी आणि लेखनापुरतेच मर्यादित होते, असे त्यांच्यातर्फे न्यायालयात सांगण्यात आले.

 

पुणे येथील भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदाअंतर्गत नवलखा व अन्य चार जणांवर आरोप लावले होते. यावर नवलखा यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, हे आरोप रद्द करण्यात यावेत अशी विनंती याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी करण्यात आली. यावेळी नवलखा यांच्यातर्फे युग चौधरी यांनी बाजू मांडली.

 

नवलखा हे मानवाधिकार कार्यकर्ते असून लेखक आहेत. त्यांना नक्षलवादी आणि सरकार अशा दोन्ही बाजूने सध्या लक्ष केले जात आहे. नक्षलवाद्यांना वाटत की, नवलखा हे सरकारच्या बाजूने आहेत तर सरकारला वाटतं की, नवलखा नक्षलवाद्यांच्या बाजूने आहेत. नक्षलवाद्यांशी त्यांचा संबंध होता मात्र, तो लिखाण आणि त्याच्यासंबंधित अभ्यासापुरताच मर्यादित होता. त्यामुळे अभ्यासासाठी असलेले संबंध बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत कसे काय येऊ शकतात?, असा युक्तिवाद चौधरी यांनी न्यायालयात केला. यावर खंडपीठाने येत्या २६ एप्रिल रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याचे सांगत तोपर्यंत नवलखा यांना अटकेपासूनचे संरक्षण दिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@