...अखेर 'टिकटॉक'ची 'टिकटिक' बंद होणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |



 


नवी दिल्ली : प्रसिद्ध चायनीज शॉर्ट व्हिडिओ अॅप्लिकेशन 'टिकटॉक'वर बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने या अॅपवर बंदी घातली होती. यावर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अॅपवरील बंदीवर स्थगिती यावी अशी विनंती केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या अॅपवरील बंदी कायम ठेवली. यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल आणि अॅपलला हे अँप आपल्या अॅप स्टोअरवरून हटवायला सांगितले आहे.

 

सोशल मिडियावर 'टिकटॉक'च्या शॉर्ट व्हिडिओने चांगलाच धुमाकूळ घातला होता. मात्र या अॅपचा गैरवापर होत असून यामुळे अश्लील मजकूर व्हायरल केला जात असल्याचे सांगत या अॅपवर बंदी घालण्याची एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने यावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. 'टिकटॉक' हे गुगल प्ले स्टोअरवरून सर्वात जास्त डाऊनलोड होणाऱ्या अॅपमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालायने या अँपवर स्थगितीस नकार दिला असला तरी पुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार असल्याचे म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@