पर्रिकर, शाह यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान : चर्चचा माफीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |




पणजी : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर व भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याबद्दल एका पाद्य्राने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल गोवा कॅथलिक चर्चने जाहीर माफी मागितली आहे. तसे पत्रकच प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘अवर लेडी’ चर्चचे फादर डिसिल्व्हा यांनी,“भाजपला मतदान करू नका,” असे आवाहन ख्रिश्चनधर्मीयांना केले होते. हे आवाहन करताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. “अमित शाह हे सैतान आहेत. तर, मनोहर पर्रिकर यांच्यावर परमेश्वराचा कोप झाल्यामुळेच त्यांना कर्करोग झाला,” असे फादर डिसिल्व्हा म्हणाले होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला


त्यानंतर चर्चवर सर्वच स्तरातून जोरदार टीका होऊ लागली. एखादे धर्मगुरू अशी वक्तव्यं कशी करू शकतात, असे प्रश्न विचारले जाऊ लागले. अखेर चर्चने सोमवारी याबद्दल पत्रक काढून या वादावर पडदा टाकला आहे. मतदानाबद्दल जागृती करा, असे निर्देश सर्वच पाद्य्रांना चर्चकडून देण्यात आले आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भाविकांना मतदानास प्रवृत्त करा. त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून द्या, अशा सूचना पाद्य्रांना देण्यात आल्या आहेत. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देऊ नका, असेही बजावण्यात आले होते. असे असतानाही डिसिल्वा यांनी थेट भाजपविरोधाची भूमिका घेतली होती. त्यामुळे चर्चला अखेर दिलगिरी व्यक्त करावी लागली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




@@AUTHORINFO_V1@@