"कॉंग्रेसचा जाहीरनामा नक्षलवाद्यांचे मनोबल वाढवणारा"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |



कोरबा : काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांमुळे नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढले आहे. त्यामुळेच नक्षलवादी हल्ले होत आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड येथील कोरबामध्ये मंगळवारी झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला.

 

पंतप्रधान मोदींनी प्रचारसभेतील भाषणात काँग्रेसवर अनेक आरोप केले. काँग्रेस पक्षाचे लोक नक्षलवाद्यांना क्रांतिकारक म्हणत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही छत्तीसगडमध्ये झालेल्या सभांमध्ये कॉंग्रेसचा समाचार घेतला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेले भाजप नेते भीमा मांडवी यांना श्रद्धांजली वाहिली.


 

नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झालेल्या परिसरात हा हल्ला झाला आहे, हे दुर्दैवी असल्याचे मोदी म्हणाले. यासाठी सर्वस्वी कॉंग्रेस पक्ष जबाबदार असून छत्तीसगड राज्याला पुन्हा हिंसेकडे नेण्याचा कट कॉंग्रेस आखत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सरकार आल्यावर देशद्रोहाचा कायदा रद्द करू, असे सांगणाऱ्या कॉंग्रेसवर नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@