राजकीय प्रचार केल्याने भाभीजींना आयोगाची ताकीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |




मुंबई : 'भाभीजी घर पर है' तसेच 'तुझसे हैं राब्ता' या मालिकेच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने सक्त ताकीद दिली आहे. मालिकेमधून राजकीय पक्षाला लाभदायक ठरणारा आक्षेपार्ह मजकूर वगळण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. यासोबतच समाज माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे यासह कोणत्याही प्रकारच्या माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर समाविष्ट असलेला भाग उपलब्ध असणार नाही याची दक्षता घेण्याचेही आदेश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिले आहेत.

 

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत कोणताही राजकीय पक्ष, उमेदवाराला लाभदायक ठरेल असा मजकूर प्रसारित करु नये असे आदेश देण्यात आले असून जाहिरातबाजी करावयाची असल्यास मजकूर पूर्वप्रमाणित करुन घ्यावा; आदर्श आचारसंहितेतील तरतुदी आणि भारत निवडणूक आयोगाच्या अन्य निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सक्त ताकीदही या मालिकांच्या निर्मात्यांना देण्यात आली आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

'ॲण्ड टीव्ही' या वाहिनीवर दि. ४ आणि ५ एप्रिल, २०१९ रोजी प्रसारित झालेल्या 'भाभीजी घर पर है!' आणि 'झी टीव्ही' या वाहिनीवर दि. २ एप्रिल, २०१९ रोजी प्रसारित झालेल्या 'तुझसे हैं राब्ता' या मालिकेच्या भागामध्ये शासनाच्या योजना तसेच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी संबंधित प्रचार आणि जाहिराती असल्याबाबत तक्रार काँग्रेस पक्षाकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती. यावर आयोगाने या मालिकेच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@