२१ वा मामी चित्रपट महोत्सव येतोय...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |


 

मुंबईकरांसाठी नवीन नवीन चित्रपटांची पर्वणी घेऊन येणाऱ्या मुंबई चित्रपट महोत्सवाच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यातील १७ -२४ तारखेदरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.

 
 
 

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने या महोत्सवाच्या तारखांची माहिती आज ट्विटरवरून शेअर केली. ती असे म्हणते की, दरवर्षी चित्रपट क्षेत्रात नवीन चित्रपटांची भर पडते. याच सिनेमाचा उत्सव म्हणून प्रतिवर्षी मामीचे आयोजन करण्यात येते ज्यामध्ये आपण नवीन गोष्टी अनुभवतो. असे म्हणत तिने या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सर्वांना केले.

 
 
 
 

मुंबई चित्रपट महोत्सवाची मुंबईकर दरवर्षी वाट पाहत असतात. या महोत्सवात जगभरातून चांगले आणि दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. या वर्षीच्या महोत्सवाचा #storytellersareus हा हॅश टॅग आहे. खऱ्या अर्थाने नवीन नवीन कथा या महोत्सवातून प्रेक्षकांना पाहायला मिळत असून यावर्षी देखील महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@