सरकारी ई बाजारपेठांच्या व्यवहारात चौपट वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2019
Total Views |




नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारांचे विभाग तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या खरेदीविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठीच्या सरकारी ई बाजारपेठांच्या पोर्टलच्या व्यवहारात २०१८-१९ या वर्षात चौपट वाढ झाली आहे. या ई बाजारपेठेतल्या विक्रेत्यांच्या संख्येतही दुप्पट वाढ झाली आहे. उत्पादने, खरेदीदार यातही वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचवेळी माल नाकारण्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी राहीले आहे.

 

या पोर्टलद्वारे १७ लाखाहून जास्त व्यवहाराद्वारे २३ हजार कोटीपेक्षा जास्त मूल्याच्या मालाची उलाढाल झाली. दोन लाखाहून अधिक विक्रेते आणि सेवा पुरवठादार यांच्यामार्फत ८.८ लाख उत्पादने उपलब्ध करुन देण्यात आली. ४२ टक्के व्यवहार हे या पोर्टलवर नोंदणी केलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाद्वारे करण्यात आले आहेत. या एकूण व्यवहारांद्वारे २५ टक्के जास्त बचत झाली आहे. ३६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले खरेदीदार या पोर्टलद्वारे खरेदी करत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@