विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीरI

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2019
Total Views |


 


मुंबई : इंग्लंड येथे होणाऱ्या २०१९च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. विराट कोहली विश्वचषक स्पर्धेसाठी १५ जणांच्या भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रवींद्र जडेजा, विजय शंकर, केएल राहुल व दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या निवड समितीने सोमवारी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या संघात रवींद्र जडेजा, विजय शंकर, केदार जाधव व हार्दिक पांड्या या चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

 

भारतीय संघ पुढीलप्रमाणे :

 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@