'चौकीदार चोर है', वक्तव्य भोवलं; राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2019
Total Views |


नवी दिल्ली : 'चौकीदार चोर है', या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावत स्पष्टीकरण मागवले आहे. भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींवर अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीसंदर्भात राहुल गांधी यांना स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यासाठी राहुल गांधींना २२ एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

 

राफेल करारासंदर्भात निकाल देताना 'चौकीदार चोर है' असा उल्लेख न्यायालयाने केल्याचे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. राहुल यांनी निकालाबाबतच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाशी संबंध जोडला असल्याचे न्यायालयाने सांगितले. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगितले होते.

 

राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत मोदींचा उल्लेख 'चौकीदार चोर है', असा केला आहे. त्यामुळे राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी, सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलेच नाही ते शब्द न्यायालयाचे सांगत मोदींवर टीका केली होती. हा न्यायालयाचा अवमान असल्याचे सांगत भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@