संजय राऊतांची जीभ घसरली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2019
Total Views |



भाईंदर :खड्ड्यात गेला तुमचा कायदा, आचारसंहितेचेही आम्ही बघून घेऊ’ हे शिवसेना खा. संजय राऊत यांचे वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आहे. या वक्तव्यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री मीरा-भाईंदर येथील एका सभेला संबोधित करताना राऊत यांनी हे वक्तव्य केले होते.

 

मीरा-भाईंदर येथील प्रचारसभेत आचारसंहितेबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “निवडणुकीचे वातावरण असल्याने आचारसंहिता आहे, आचारसंहिता आहे असे बोलले जाते. त्यामुळे सर्वांच्याच मनात आचारसंहितेबद्दल एक अनामिक भीती असते. मात्र, आम्ही कायदा वगैरे मानणार्‍यांपैकी नाही. त्यात आम्हाला सतत आचारसंहिता आहे, आचारसंहिता आहे असे सांगितले गेल्यास आम्ही आचारसंहितेचेही बघून घेऊ. कायदा गेला खड्ड्यात, आमच्या मनात जे असते ते आम्ही बोलतो,” असे बेधडक वक्तव्य त्यांनी केले. “जी गोष्ट आमच्या मनात आहे, हृदयात आहे, ती आम्ही बाहेर नाही काढली, तर गुदमरल्यासारखे होते. त्यामुळे मोकळेपणाने बोलले पाहिजे,” असे ते म्हणाले. राऊत यांच्या या भाषणाचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आचारसंहिता भंग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यावर तीन दिवसांची, तर बसपाच्या मायावती यांच्यावर दोन दिवसाची प्रचारबंदी निवडणूक आयोगाने लागू केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता राऊत यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने निवडणूक आयोग त्यांच्यावर काय कारवाई करू शकते, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@