भाजपकडून रवि किशन लोकसभेच्या मैदानात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2019
Total Views |




नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर येथून भोजपूरी अभिनेता रवी किशन याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 'निरहुआ'नंतर भाजपने रवी किशनच्या रूपाने आणखी एका भोजपुरी अभिनेत्याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे.

 

गोरखपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, विद्यमान खासदार प्रवीण निषाद यांनी सपामधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना संत कबीर नगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. पूर्वांचलमध्ये आठ जागांवरील उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. प्रतापगड-संगमलाल गुप्ता, आंबेडकर नगर-मुकुट बिहारी, संतकबीर नगर-प्रवीण निषाद, गोरखपूर-रवी किशन, देवरिया-रमापती राम त्रिपाठी, जौनपूर-के. पी. सिंह आणि भदोही-रमेश बिंद, आदी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

भाजपने संत कबीर नगरातील विद्यमान खासदार शरद त्रिपाठी यांच्याऐवजी त्यांचे वडील रमापती त्रिपाठी यांना देवरियातून उमेदवारी दिली आहे. देवरियातील विद्यमान खासदार कलराज मिश्र यांनी आधीच निवडणुकीतून माघार घेतल्याने या जागेचाही पेच भाजपने मिटवला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@