फुटीरता गाडिली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2019   
Total Views |



आमचे बाबासाहेब भारतीय होते. त्यांचे जगणे, त्यांचे वागणे आणि मुळात दिसणेही भारतीयच होते. तसेही बाबासाहेब किती रूबाबदार आणि देखणे भारतीय रूप लाभलेले होते हे सांगणारे कितीतरी जण आजही आहेत. बाबांचे छायाचित्र नेहमी कसा असते, तर रेखीव नाक-डोळे आणि तेजपुंज प्रसन्न भावमुद्रा किंवा विचारांमधली भावमुद्रा. पण यावर्षी काही ठिकाणी बाबांच्या छायाचित्रातील चेहऱ्यात थोडा बदल केलेला दिसला. चेहऱ्याची माओच्या चेहऱ्याशी सादृश्यता होती. हे का? तर भोळ्या-भाबड्या जनतेला बाबासाहेबांच्या चेहऱ्यात माओचा चेहरा दिसावा. कोणी म्हणेल काय हे तर्क आहे. पण ज्यांना माओवाद्यांच्या तक्षकरूपाची नीती माहिती आहे, त्यांना या छायाचित्रांतून माओवाद्यांना काय साध्य करायचे आहे हे कळेलच. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होतील. या कार्यक्रमांमध्ये बाबांच्या कर्तृत्वाचा, बाबांच्या विद्वतेचा जयघोष निनादेल. पण असेही काही जलसे होतील जिथे, ‘उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे’ किंवा ‘भिमराज की बेटी मै तो जय भिमवाली हूं’सारखी गाणी तोंडी लावण्यापुरती सुरुवातीला गायली जातील. मग हलकेच एक गाणे गायले जाईल ‘दलित मुक्तीसाठी भिम लढीला, शोषणमुक्तीसाठी भिम लढीला या देशानं भिम गाडिला, बाई या देशानं भिम गाडिला’ छे! ही वाक्यं लिहितानाही मनात दु:ख होते. पण ही अशी गाणी घेऊन काही लोक आता संवेदनशील वस्त्यात बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जातील. ते बाबासाहेबांना गाडण्याचे गाणे गातील आणि वर बाबासाहेबांचे विचार तोडून मोडून जनतेला भडकावतील. जे कलेमधून बाबासाहेबांना गाडण्याचा विचार करतात, ते आपल्या कलामंचला नाव देतात मात्र ‘कबिरां’चे किंवा ‘समते’चे. हे कोण लोक आहेत? यांना समाजाशी, देशाशी आणि प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या राष्ट्रप्रेमी विचारांशी काही देणंघेणं नाही हेच खरे. बाबासाहेबांची जनता भोळी आहे पण, मूर्ख नाही. बाबासाहेबांच्या नावाने समाजाला बाबासाहेबांच्या विचारांपासून दूर करणाऱ्या लोकांना समाज दूरच ठेवेल. ‘बाई या देशानं भिम गाडिला’ म्हणणाऱ्यांना देशप्रेमी, आंबेडकरप्रेमी जनता म्हणेल, “तुम्ही कितीही बोंबला पण, भिमविचाराने फुटीरतावाद गाडिला... बाई देशद्रोह गाडिला...’

 

निघालो पुढच्या ‘शो’ला...

 

तिकडून बोलावणं आल्याशिवाय मी बाई काही बोलणारच नाही. त्यांनी आदेश द्यावा की मी जाणार. राक्षसाचा जीव पोपटात तसा माझ्या इंजिनाचा जीव बंद पडलेल्या घड्याळात. नाही... नाही... तिकडून बोलावणं आल्याशिवाय मी काही बोलणारच नाही. ते तर ते त्यांचे थोरले राजे पंजाधारी हायकमांड त्यांच्याही सेवेत मी रूजू आहे. काय म्हणता हा कसला धर्म? मला धर्मच नाही. अधर्म हा माझा धर्म. सेटिंग करू बेटिंग करू, मांडवली करू, खळ्ळखट्ट्याक करू पण, सारे सारे करू ते केवळ आणि केवळ माझ्या फायद्यासाठी करू. हा माझा मनसे म्हणजे मनापासूनचे शाश्वत मंत्र आहे. ‘माझा मंत्र केवळ माझ्यासाठी त्यामुळे राजा तुपाशीआणि माझे सैनिक उपाशी असणारच. पण असू द्यात. सैनिकांनी केवळ आणि केवळ माझे ऐकायचे बस्सं. त्यात आमची भूमिका काय? आमचे भविष्य काय? गेला बाजार आमचा फायदा काय, असले फालतू प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत. इथे मलाच काय भूमिका नाही, भविष्य नाही तर मी त्यांना काय देणार? यावर काही दुष्ट लोक म्हणतात की, मला फायदा तर आहे ना? पण मग, मिमिक्री मी करणार, ‘कपिल शर्मा शो’पेक्षाही किंवा ‘चला हवा येऊ द्या’ पेक्षाही ‘नंबर वन कॉमेडी शो’ मी करणार सगळं सगळं मी करणार. मग त्याचा फायदा मलाच व्हायला हवा ना? सैनिक काय? ते तर माझे शो फुकट पाहायला आणि ऐकायला येतात. त्यांचे आणि तमाम इतर लोकांचे मनोरजंन करतो. मग यांचे मनोरंजन पण करायचे आणि वर त्यांना फायदा पण द्यायचा हे तर फारच होते. हे लोकांना कळत नाही का? त्यामुळे मी सैनिकांचे भविष्य, भूमिका वगैरे वगैरे वगैरे बिनकामाच्या गोष्टींविषयी बोलण्यास बिलकूल रस नाही. काकांच्या घरचा पाहुणचार घेता घेता आता सुळेताई तसेच पार्थबाळ या साऱ्यांसोबत आदर्शवाद जपणाऱ्या नांदेडकर अशोक चव्हाण तसेच पुण्यातला पंजाधारींचेही निमंत्रण स्वीकारणार आहे. काय म्हणता सुपारी घेतली का? ‘सुपारी’ हा शब्द नटरंग चित्रपटामध्ये ऐकलाय. तसेच काहीसे पण इथे नाचबिच नाही, तर ‘कॉमेडी शो’ची सुपारी आहे. मानाचा मुजरा काकासाहेबांना आणि हायकमांडना करण्यासाठी निघालोय... मोहिम फत्ते झाली की आणखी सुपाऱ्या मिळतील. आम्ही निघालो पुढच्या ‘शो’ला...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@