शरद पवारांकडून असत्याचा प्रचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे खोटारडेपणाचा प्रचार करीत आहेत, असा घणाघात आज रविवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला. स्वत:च्या पक्षाचे अंध:कारमय भवितव्य आणि उमेदवारीवरून सुरू असलेली कुटुंबीयातील भांडणे यामुळे पवार हे खोटारडेपणाचा आश्रय घेत प्रचार करीत आहेत, असे अमित शाह म्हणाले. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी राफेल व्यवहार न पटल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा देऊन गोव्यात मुख्यंमत्री म्हणून जाणे पसंद केले, असे वक्तव्य राकाँ प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रपरिषदेत केले होते. त्या वक्तव्याचा समाचार आज अमित शाह यांनी घेतला.

 

पवार साहेब, माजी संरक्षण मंत्री म्हणून तुमच्याकडून अधिक चांगली अपेक्षा आहे. मात्र, तुमच्या कुटुंबातील कलहामुळे तुम्ही चिंतित आहात, असे ट्विट आज अमित शाह यांनी शरद पवार यांना उद्देशून केले. पदत्यागाचे म्हणत असाल, तर तुम्ही काँग्रेसचा त्याग कां केला, ते आठवते कां? आणि त्यानंतर आपण काय केले? असा सवाल अमित शाह यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला. सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा मुद्या उपस्थित करून पवार यांनी १९९९मध्ये काँग्रेस सोडली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून, महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. त्याची आठवण करून देत, शाह यांनी पवार यांच्यावर हा निशाणा साधला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@