भारतीय क्षेपणास्त्रांची अनेक देशांना गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : “जगातील अनेक देशांना आपल्या सैन्यशक्ती संवर्धनासाठी भारतीय क्षेपणास्त्रे आपल्या ताफ्यात असावीत,” असे वाटत असल्याचा दावा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. “भारतात तयार करण्यात आलेल्या संरक्षण साहित्यांची निर्यात केली जाऊ शकते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

परकीय शस्त्रास्त्रांवर अवलंबून असलेल्या भारताच्या संरक्षण क्षेत्राबद्दल निर्मला सीतारामन यांनी केलेले हे वक्तव्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण, देशाजवळील ५० टक्के सैनिकी साहित्य परकीयच आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “तुम्ही एकीकृत क्षेपणास्त्राच्या कार्यक्रमावर चर्चा करा, ज्यामुळे कितीतरी चांगले परिणाम होत आहेत. आज कितीतरी देशांना क्षेपणास्त्रांची गरज आहे, या सगळ्यांचीच एक बाजारपेठ आहे. अनेक देश भारताशी संबंध स्थापन करू इच्छितात, भारताकडून शस्त्रास्त्रे खरेदी करू इच्छितात,” असे सांगत सीतारामन म्हणाल्या की, “भारतात संरक्षण सामग्रीची निर्यात करण्याची अपार क्षमता आहे. जहाजबांधणीची, युद्धनौका उभारणीची क्षमता आपल्याकडे आहे. आणि भारतीय क्षेपणास्त्रांची अनेक देशांना गरज यातली भारताची क्षमता इतरांनाही चांगलीच ठाऊक आहे. आम्हाला तुमची ही क्षमता देऊन आमची मदत करा, अशी अनेक देशांची मागणी आहे.”

 

सीतारामन यांनी यावेळी एअरोस्पेस पीएसयूचेही उदाहरण दिले तसेच हिंदुस्तान एअरोनॉटिक्सला संरक्षण साहित्याची निर्यात करण्यासारखे बनवण्यासाठी सल्ला देण्याचे आवाहनही केले. एचएएलचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, “मी एचएएलला निर्यात वाढवण्याबद्दल सांगत असते, तसेच वायुसेनेकडून वेळेत पैसे न मिळाल्याची तुमची तक्रार आहे, पण वेळेवर उत्पादने व उपकरण न पोहोचवल्याच्या तुमच्या तक्रारीदेखील आहेतच की!” सीतारामन म्हणाल्या की, “एचएएलची उत्पादन क्षमता वाढवली तरीही भारतीय सैन्याने केलेली मागणी वेळेवर पुरवण्यात बराच वेळ लागत आहे.”

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@