५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे नामांकने जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2019
Total Views |



मुंबई : ५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सव प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची तर तांत्रिक पुरस्कार ७ व एक बालकलाकार अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत तब्बल ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या.

 

अंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, आणि डॉ.काशिनाथ घाणेकर, फायरब्रँड, बंदीशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. ५० हजार रुपये व मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप असणार आहे.

 

घोषित झालेली पारितोषिके

 

उत्कृष्ट कला दिग्दर्शन - नरेंद्र हळदणकर (बंदीशाळा)

उत्कृष्ट छायालेखन - सुधीर पळसाने (आणि डॉ.काशिनाथ घाणेकर)

उत्कृष्ट संकलन - नचिकेत वाईकर (तेंडल्या)

उत्कृष्ट ध्वनीमुद्रण - गंधार मोकाशी (आणि डॉ.काशिनाथ घाणेकर)

उत्कृष्ट ध्वनी संयोजन - मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान)

उत्कृष्ट वेशभूषा - चैत्राली गुप्ते (एक सांगायचय अनसेड हार्मोनी)

उत्कृष्ट रंगभूषा - विक्रम गायकवाड (आणि डॉ.काशिनाथ घाणेकर)

उत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ) आणि अमन कांबळे (तेंडल्या)

 

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार २६ मे २०१९ रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@