पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार घोषित!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रशियातील 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल' या सर्वोच्च पदकाने मोदींचा सन्मान करण्यात येणार आहे. रशियन दूतावासाने ट्विट करून ही माहिती दिली. रशिया आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ केल्याने रशियाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन मोदींचा सन्मान करण्यात येत असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल' हा रशियाचा सर्वाच्च पुरस्कार असून उत्तम कामगिरी करणारे राजकीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो. १७ व्या शतकाकात या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान मोदींना आजपर्यंत यूएई, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, पॅलेस्टाईन आणि अफगाणिस्तान या देशांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@