जेट एअरवेज 'जमिनीवर' ; प्रवाशांचा खोळंबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2019
Total Views |



मुंबई : 'जेट एअरवेज' कंपनीच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. जेट एअरवेजची बहुतांश विमाने गुरुवार रात्रीपासून जमिनीवर आहेत. शुक्रवार संध्याकाळपर्यंत जेटची विमाने उड्डाण घेणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

 

जेट एअरवेज सध्या गंभीर आर्थिक नुकसानीचा सामना करत आहे. नरेश गोयल यांनी काही दिवसांपूर्वीच जेट एअरवेजच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 'जेट एअरवेज'ने 'ऑपरेशनल इश्यूज'चे कारण देत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. जेट एअरवेजच्या विमानांना डीजीसीएने उड्डाण करण्यास परवानगी नाकारली असल्याची माहिती देण्यात अली आहे.

 

'एतिहाद एअरवेज'ने 'जेट'मध्ये रस दाखवला असून ही विमानं भाडेतत्त्वावर 'एतिहाद'सारख्या इतर विमान कंपन्यांद्वारे संचालित केली जाऊ शकतात. दरम्यान, अनेक प्रवासी विमानतळावरच अडकले आहेत. प्रवाशांनी गैरसोयीबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस आणि सीआयएसएफची फौज तैनात करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@