मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे व्हिजन थिअरपी गरजेची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2019
Total Views |



वसईत 'अंधदुःख निवारक मंडळा'चा हिरक महोत्सव थाटात

 

खानिवडे : वसईत १९५९ पासून आपल्या स्वतंत्र दवाखान्यातर्फे नेत्र रुग्णांना मोफत आणि नाममात्र शुल्कात नेत्र चिकित्सा सेवा पुरविणाऱ्या 'अंधदुःख निवारक मंडळ' या संस्थेचा हिरक महोत्सवी समारंभाचा सोहळा शेषवंषी क्षत्रिय समाज (भंडारी समाज) सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे कायमस्वरुपी विश्‍वस्त भाऊसाहेब मोहोळ हे होते. तर वसईतील ज्येष्ठ नेत्र चिकित्सक डॉ.रघुवीर जोशी हे या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

संस्थेचे प्रारंभापासूनचे विश्वस्त डॉ. उदय दोंदे यांनी गेल्या ६० वर्षातील हॉस्पिटलशी निगडीत आठवणींना उजाळा यावेळी भाषणात दिला. डॉ.जोशी यांनी हॉस्पिटलची भरभराट होवून आत्मनिर्भर व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात भाऊसाहेब मोहोळ यांनी, आपण हॉस्पिटलच्या कार्यात मिळणाऱ्या समाधानामुळेच आज वाढत्या वयातही काम करीत असून सर्वांनी उत्साहाने व एकत्रितपणे काम करावे,असे आवाहन केले.

 

संस्थेच्या कार्यकारी विश्‍वस्त सौ.मेघना कुलकर्णी यांनी, कायम विश्वस्त स्व. प्रतापभाई खोखाणी,तसेच या हॉस्पिटलचे मुळ शिल्पकार डॉ.गणेश भिकाजी परुळेकर, दोंदे बंधू, हाटकर, खवणेकर जयवंत यांच्या कार्याची आठवण करुन दिली. नविन अत्याधुनिक यंत्र खरेदी, तळमजल्याचे रिनोवेशन, संख्यात्मक कामाबरोबर गुणात्मक वाढ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक जणांनी देणगी रुपाने हॉस्पिटलला मदत दिली व अनेक जण देत असतात. तरी वरील दोन मजल्याच्या रिनोवेशनसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. या हॉिस्पिटसाठी डॉ.घाटे यांच्या कार्याचा व मदतीचा उल्लेख केला. हॉस्पिटलमध्ये नवीन व्हिजन थिअरपी सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

व्हिजन थिअरपी तज्ज्ञ लॅरीना आल्मेडा यांनी व्हिजन थिअरपी म्हणजे काय? व त्याची आवश्यकता यावेळी बोलतांना स्पष्ट केली. लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्व वयातील लोकांना व्हिजन थिअरपीची आवश्यकता भासू शकते. कॉम्प्युटर व मोबाईल यांच्या वाढत्या वापरामुळे सध्या या थिअरपीची असलेली आवश्यकता स्लाईडमार्फत त्यांनी स्पष्ट केली. कायम विश्वस्त अ‍ॅड. अभय पाटील, माजी प्रचार्या द.वि.मणेरीकर, डॉ.आनंद नेरकर, स्वामी वसंत(सकवार), अशोक पाटील, कौशिक शाह, जाधव सर हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होेते. सुत्रसंचालन मृदुला चिपळूणकर यांनी केले. विशेष निमंत्रित सुभाष दांडेकर, प्रसिध्द उद्योजक व लायन हर्षद भाई मेहता यांचे संदेश वाचून दाखविण्यात आले.

 

या कार्यक्रमात कँप भरविण्यास सहाय्य करणार्‍या व्यक्ती, निधी संकलन करणार्‍या शाळांचे चालक व मुख्याध्यापक यांचे सत्कार करण्यात आले. सर्वाधिक निधी संकलन करणार्‍या कु.अस्मि जितेंद्र हाटकर व कु.अनन्या पराग मणेरीकर या विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. लक्ष्मणबाई लुयानी लायन्स क्रुब ऑफ जुहू व सेवक ट्रस्ट महालक्ष्मी ट्रस्ट यांच्या विशेष मदतीमुळे बरेचसे विनाशुल्क काम उभे राहात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विवेकानंद म्हात्रे यांनी आभारप्रदर्शन केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@