४३ दिवसांनी बालाकोटमध्ये पोहोचली प्रसिद्धीमाध्यमे आणि...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |



बालकोट : पुलवामा हल्ल्यानंतर जैशच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल ४३ दिवसांनी पाक सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेले. मात्र पत्रकारांसोबत यावेळी पाकिस्तान लष्कराचे सैन्यही त्यांच्यासोबत होते. ज्या वेळेला यावेळी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलेल्या प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पाक सैन्याने केला आहे.

 

परदेशी पत्रकारांनी बालकोट परिसरातील स्थानिक लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी पाकिस्तानी सैन्य स्थानिक जनतेला पत्रकारांशी संवाद साधण्यात टाळत होते. पाकिस्तानकडून नक्कीच काहीतरी लपविण्याचा प्रयत्न केला जातो असा संशय आता व्यक्त केला जात आहे. काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत असणाऱ्या बालकोट भागात घुसून दहशतवादी तळांना उध्वस्त केले. मात्र, पाकिस्तानकडून बालकोट भागात ज्याठिकाणी भारताने हल्ला केला तिथे दहशतवादी तळ नसून मदरसा चालविण्यात येत होती असा दावा केला होता. या घटनेनंतर पाकिस्तानकडून माध्यमांना दावा करण्यात आला होता की, आम्ही लवकरच पत्रकारांना त्या भागात आणले जाईल.



 
 
 

वस्तूस्थिती लपवल्याचा पत्रकारांचा आरोप

पाकिस्ताने ४३ दिवसानंतर माध्यमांना त्या परिसरात घेऊन गेला मात्र, वस्तूस्थिती लपवण्याचा प्रयत्न यावेळी केला गेला. इस्लामाबाहून एक हेलिकॉप्टरमधून पत्रकारांना नेण्यात आले. त्यानंतर मनसेराजवळ हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. तेथून पुढे दीड तास अवघड असलेला डोंगराळ भागातील रस्त्यातून पत्रकारांचा प्रवास झाला, अशी माहिती या ठिकाणी जाणाऱ्या पत्रकाराने दिली आहे.

 

मदरशाजवळच्या फलकावर यूसुफ अजहरचे नाव

प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना तीन वेगवेगळ्या भागात नेण्यात आले. भारताच्या हवाई हल्ल्यात केवळ झाडांचे नुकसान झाल्याचे दिसत होते. या ठिकाणी प्रसार माध्यमे घेऊन येण्यासाठी तुम्ही इतके दिवस का लावले, असा प्रश्न केल्यावर मात्र, पाकच्या लष्करी अधिकाऱ्यांकडे त्याचे उत्तर नव्हते. अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तणावग्रस्त परिस्थिती असल्याने येथे आणणे अवघड होते, असे सांगण्यात आले. आता परिस्थिती आटोक्यात असल्याने हा पत्रकारांचा दौरा आयोजित केल्याचे लष्कराने सांगितले. मदरसाजवळ असणाऱ्या बोर्डवर मौलाना यूसुफ अजहरचे नाव आढळले. त्यावर प्रतिप्रश्न केल्यानंतरही पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@