'विकिलिक्स'च्या ज्युलियन असांजेला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजेला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. त्याला इक्वेडोरच्या दूतावासात अटक करण्यात आली. २०१२ पासून ज्युलियनने असांज दूतावासात आश्रय घेतला होता. असांजेवर स्वीडनमध्ये लैंगिक छळाचा आरोप आहे. या प्रकरणात ब्रिटनमधील न्यायालयाने त्याला २०१२मध्ये जामीन दिला. तेव्हापासून तो इक्वेडोरच्या दूतावासात आश्रयाला होता.

 

अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा सहसंस्थापक ज्युलियन असांजे याला ब्रिटन पोलिसांनी अटक केली. इक्वाडोर येथील दूतावासातून त्याला ताब्यात घेतलं आहे. ब्रिटन पोलिसांनी गुरूवारी त्याच्या अटकेची माहिती दिली. "४७ वर्षीय असांजेला आज, ११ एप्रिलला मेट्रोपॉलिटन पोलिसांनी इक्वाडोर येथील दूतावासातून अटक केली आहे." अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@