राज्यात मतदार जागरुक मंच स्थापन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |



१८ हजारांहून अधिक व्यक्ती मतदानाविषयी जागृती करणार


मुंबई : मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे यासाठी राज्यात 'मतदार जागरुक मंच' स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये १८ हजारांहून अधिक व्यक्तींना मतदानाविषयी विविध माध्यमातून जागृती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

हा मंच 'मतदान पाठशाळा, निवडणूक साक्षरता क्लब, मतदार जागरुक मंच' अशा चार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काम करत आहे. 'मतदान पाठशाळा' याअंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ९ हजार ६०३ व्यक्तींना याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर औपचारिक शिक्षण प्रवाहाच्या बाहेर असलेल्या मतदारांसाठीही 'मतदान पाठशाळा' आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये शाळांमध्ये मतदान जागृती करण्यात येत असून ५ हजार ३५० व्यक्ती मतदानाचे महत्त्व समजावून सांगत आहेत.

 

पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणाऱ्या नवमतदारांना मतदानाच्या हक्काबाबत सजग करण्यासाठी विविध महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यांच्यासाठी 'निवडणूक साक्षरता क्लब' स्थापन करण्यात आले आहेत. यासाठी २ हजार ४८६ व्यक्ती हे काम करीत आहेत. मतदार जागरुक मंचाच्या (वोटर अवेरनेस फोरम) माध्यमातून जवळपास १ हजार २२१ व्यक्ती काम करीत असून शासकीय-निम शासकीय कार्यालये, पंचायत समिती, स्वयंसेवी संस्थामध्ये काम करणाऱ्या अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी या व्यक्ती प्रयत्न करत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@