नक्षली हल्ल्यांना न जुमानता विक्रमी मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |


गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांवर दिवसभर हल्ले सुरूच आहेत. या परिसरात लोकसभा निवडणूकांसाठी मतदान होत असून सायंकाळी मतदान संपताच पुन्हा नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून आणला. स्फोटात सी ६० पथकाचे तीन जवान जखमी झाले आहेत.

 

सायंकाळी उशीरा झालेल्या हल्ल्यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. एटापल्ली तालुक्यातील पुरसगोंदी मतदान केंद्रावरून निघालेल्या कमांडोच्या तळाला नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले आहे. नक्षलवाद्यांकडून सलग तिसऱ्यांदा हल्ला करण्यात आला आहे. जखमी कमांडोंना हेलिकॉप्टरने उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

 

सायंकाळी निवडणूक आयोगाच्या पथकावरही हल्ला करण्यात आला. लोकसभेच्या आज होणाऱ्या मतदानावेळी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कारवाया केल्या. तरीही गडचिरोली-चिमूर मतदारसंघात विदर्भातील इतर मतदार संघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.

 

गडचिरोलीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान झाले. दरम्यान, गुरुवारी सकाळी एटापल्ली येथील वाघेझरीच्या अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांनी मतदान केंद्राजवळ स्फोट घडवला. नक्षल्यांचा विरोध झुगारून लोक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. याच दरम्यान नक्षल्यांनी स्फोट घडवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@