लोकशाही उत्सवाला आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |


 


मुंबई : १७व्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणूक प्रक्रिये अंतर्गत आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशभरातील ९१ मतदारसंघासह राज्यातील विदर्भातील ७ मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.

 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात मतदानाचा हक्क बजावला. रामटेकमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार कृपाल तुमाने यांचे मतदान, उन्हाची तमा न बाळगता लोकशाहीच्या सणाला बाहेर निघा, मतदान करण्याचे केले आवाहन. नितीन गडकरी यांनीदेखील सहकुटुंब नागपुरात मतदानाचा हक्क बजावला.

 

नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीसीठी एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडावे म्हणून एकूण ११ हजारांवर सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

 

 
 

बघूया सकाळी मिळालेल्या माहितीनुसार कुठे किती मतदान झाले?

 

> भंडारा-गोंदिया दुपारी १ वाजेपर्यंत वाजेपर्यंत अंदाजे ३२.०२ टक्के मतदान

 

> यवतमाळ वाशिम दुपारी १ वाजेपर्यंत २६.२९ टक्के मतदान

 

> गडचिरोली जिल्ह्यात ४२ टक्के मतदान

 

> दुपारी १ वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात २७.४७ टक्के मतदान

 
>  रामटेक - २३.२९ टक्के
 

> वर्धामध्ये ३०.२२ टक्के

 
> चंद्रपूर - ३०.५ टक्के 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@