सीएसएमटी पूल दुर्घटनेचा आणखी एक बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |



मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जोडणारा हिमालय हा पादचारी पूल कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या नंदा कदम या ५७ वर्षीय महिलेचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७ झाली आहे. वाशी येथील एमजीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

 

१४मार्चला सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पुलाचा काही भाग गुरुवारी संध्याकाळी कोसळला होता. या अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते. नंदा कदम यांच्या २७ दिवसांनी झालेल्या मृत्यूनंतर आता मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे. दुर्घटनेनंतर काही दिवसांतच डी. डी. देसाईज कंपनीच्या नीरजकुमार याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी पोलिकेचा निलंबित सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळते याला बेड्या ठोकण्यात आल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@