गुर्जर समाजचे नेते किरोडी सिंह बैसला भाजपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : राजस्थानमध्ये हनुमान बेनिवाल यांच्या आरएलपी पक्षाशी युती केल्यानंतर भाजपने आणखी एक मास्टर स्ट्रोक लगावला आहे. राज्यात प्रभावी असलेल्या गुर्जर समाजाचे नेते किरोडी सिंह बैंसला आणि त्यांचा मुलगा विजय बैसला यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. बैसला यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेससाठी मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

 

बुधवारी दिल्लीतील भाजप मुख्यलयात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत किरोडी सिंह बैंसला यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीमुळे प्रभावित होऊन मी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे यावेळी बैसला यांनी सांगितले. दरम्यान, गुर्जर समाजाला सरकारी नोकरीमध्ये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@