मतदानाची वेळ दीड तासांनी वाढवली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्यापासून या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावर्षी लोकसभा निवडणुकीसाचा वेळ वाढवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मतदानाच्या वेळेत दीड तासांची वाढ करण्यात आली असून यावर्षी मतदान प्रक्रिया ११ तास चालणार आहे.

 

व्हीव्हीपॅट मशीनवर एका मतदानासाठी लागणारा सहा सेकंदांचा वेळ आणि उन्हाळ्याचा विचार करून निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ दीड तासांनी वाढवल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. यानुसार निवडणूक आयोगाने सकाळी अर्धा तास, तर सायंकाळी एक तासाची वेळ वाढवली आहे. त्यामुळे नवीन नियमानुसार, आता मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी असणार आहे.

 

व्हीव्हीपॅट काय आहे?

 

यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे मतदाराने मतदान केल्यानंतर संबंधित उमेदवारालाच मत झाल्याची खात्री करता येणार आहे. यासाठी मतदाराला आपण दिलेल्या मताची एक चिठ्ठी व्हीव्हीपॅटवर दिसणार आहे. या सर्व प्रक्रियेला सहा सेकंदाचा वेळ लागणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@