पाकिस्तानातील मंदिरांचे हिंदू समुदायाला हस्तांतरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |




इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने मंदिरांची परीस्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाक फाळणीपूर्वी पाकिस्तानातील राहत असलेल्या हिंदूची संख्या त्यावेळी जास्त होती. पाकिस्तानात बनवलेल्या मंदिरांचे हस्तांतरण हिंदू समुदायाला करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने दिला आहे.

 

गेली अनेक वर्षे या मंदिरांची काळजी न घेतल्याने ही मंदिरे पडझड झाली होती. अनेक मंदिरांच्या जागेवर माशीदींची स्थापना करण्यात आली होती. या मंदिरांची परिस्थिती सुधारावी यासाठी पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला. या अंतर्गत पाकिस्तानमधील मंदिरे तेथील अल्पवयीन हिंदू समुदायाला देण्यात येणार आहे. पाकिस्तान सरकारने चारशेहून अधिक मंदिरे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सियालकोट आणि पेशावर येथील मंदिरांपासून हस्तांतराची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सियालकोट येथे जगन्नाथाचे प्रचीन मंदिर आहे. हे मंदिर १ हजार वर्षाहून जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. बाबरी मशिदीच्या वादानंतर हिंदूना या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. हिंदू भाविकांसाठी हे मंदिर खूले करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

काही दिवसांपूर्वी हिंदू अधिकार चळवळीने एक सर्व्हेक्षण पाकिस्तानमध्ये केले होते. या सर्व्हेक्षणानुसार मंदिराची आकडेवारी समोर आली होती. अगोदर पाकिस्तानी सरकारने ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता पाकिस्तान सरकारने मंदिरांच्या दर्शनाला परवानगी दिली आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@