राहुल गांधींकडून न्यायालयाचा अवमान : निर्मला सितारामन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |




नवी दिल्ली : राफेलच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला जाब विचारणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार हल्ला चढवला. राफेल प्रकरणातील राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पहिला परिच्छेदही वाचला नाही, असे त्या म्हणाल्या. बुधवारी राफेलची याचिका न्यायालयाने स्वीकारली कोर्टानेही 'चौकीदार चोर है' हे मान्य केल्याचे राहुल यांचे म्हणणे आहे.

राहुल गांधी हे साफ खोटे असून राहुल यांनी खोटं बोलून न्यायालयाचा अवमान केला आहे, अशा शब्दांत सीतारामन यांनी राहुल यांच्यावर हल्ला चढवला. राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर राहुल गांधी यांनी कोर्टानेही 'चौकीदार चोर है' असे म्हटले होते. त्यावर सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल यांच्या आरोपांचे खंडन केले.

 

राहुल गांधी हे स्वत: जामिनावर आहेत. राजकीय मर्यादांचे उल्लंघन करत त्यांनी देशवासीयांची दिशाभूल करत आहेत. न्यायालयाने ज्याचा उल्लेखच केला नाही, तसे सांगत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल जनतेबद्दल संभ्रम निर्माण केला, अशी टीका निर्मला सितारामन यांनी केली आहे. राफेल प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्र सरकारची विनंती अमान्य करत, गहाळ दस्तावेज वैध असून, विचाराधीन असलेल्या दस्तावेजांच्या आधारे नव्याने सुनावणी घेण्यात येईल, असा निर्णय सर्वोच्च न्ययालयाने दिला आहे, त्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@