'पीएम मोदी' चित्रपटावर निवडणूक आयोगाची स्थगिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |



मुंबई : 'पीएम मोदी' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित चरित्रपटावर सध्या बंदीचे ढग आले आहे. या चित्रपटावर निवडणूक आयोगाने तूर्तास स्थगिती आणली आहे. "चरित्रपटांमध्ये व्यक्तीच्या कामाबद्दल आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती दिलेली असते. निवडणुकांच्या काळात अशाप्रकारचे चरित्रपट प्रदर्शित करता येऊ शकत नाहीत." असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने यावेळी दिले.

 

त्यामुळेच हा चित्रपट थिएटरसह कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रदर्शित करता येऊ शकणार नाही. तसेच 'एनटीआर' आणि 'उद्यमा सिमहं' या चित्रपटांवरही निवडणूक आयोगाने स्थगिती आणली आहे. 'पीएम मोदी' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला होता. तसेच, सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला ‘यु प्रमाणपत्र’ देण्यात आले. मात्र, चित्रपटातील ११ दृश्यांना कात्री लावण्यात आली. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती आणि निर्णय निवडणूक आयोगाच्या न्यायालयावर सोपवला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@