#MeToo : प्रिया रमानी यांच्या अडचणीत वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |



 

नवी दिल्ली : 'मी टू' प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांच्याविरोधातील आरोप सिद्ध न झाल्याने पत्रकार प्रिया रमानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एम.जे.अकबर यांनी या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल करत प्रिया रमानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

नेमके प्रकरण काय ?

भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी मी टू या सोशल मीडियावरील मोहीमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. एम.जे.अकबर यांन प्रिया रमानी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अपमान केल्याचा आरोप बुधवारी निश्चित केला.

मानहानीचा खटला दाखल

प्रिया रमानी यांनी एम. जे. अकबर यांच्‍यावर लैंगिक शोषण केल्‍याचे आरोप केले होते. यानंतर प्रिया रमानी यांच्‍यावर एम. जे. अकबर यांनी मानहानी केल्‍याचा खटला दाखल केला. आता रमानी यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. हा आरोप सिद्ध झाल्याने प्रिया रमानीच्या अडचणी अधिक वाढणार आहेत. मुख्य न्यायमूर्ती समर विशाल यांच्यासमोर प्रिया रमाणी हजर झाली होती. न्यायालयाने प्रिया रमाणी यांनी आरोपाचे खंडन करत निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

आरोप बदनामीसाठी : न्यायालय

माजी केंद्रीय मंत्री एम.जे अकबर यांच्यावर २० महिला पत्रकारांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोप केले होते. हा आरोप करणाऱ्या रमानी या पहिल्या महिला पत्रकार होत्या. याबद्दल लैगिंक शोषणाचे आरोप झाल्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी एम.जे अकबर यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. प्रिया रमानी यांनी अकबर यांच्यावर केलेले आरोप बदनामीकारक असल्याचे कोर्टाने म्हटले होते.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@