छापेमारीची पूर्वकल्पना द्या : आयोगाची कानउघाडणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या छापेमारीमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मात्र यावरुन निवडणूक आयोगाने संताप व्यक्त करत आयकर विभागाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. मापे टाकताना आयकर विभागाने निवडणूक आयोगाला कळवणे भाग आहे.

 

निवडणुकीच्या काळात कुठेही छापा टाकायचा असेल तर त्याआधी निवडणूक आयोगाला याची पूर्वसूचना देणे गरजेचे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. मध्य प्रदेशात जी छापेमारी करण्यात आली त्यासंबंधीची सूचना प्राप्तीकर विभागाने निवडणूक आयोगाला दिली नव्हती. देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आयोगाला छाप्यासंबंधी माहिती असणे गरजेचे आहे, असेही आयोगाने म्हटले आहे.

 

'निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्तिकर खात्याचे सुरू असलेले छापे राजकीयदृष्ट्या निष्पक्ष असतील आणि गैरप्रकार रोखण्यासाठी छापे सुरूच ठेवले जातील,' अशी ग्वाही महसूल सचिव, तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने निवडणूक आयोगाला दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@