अल्पेश ठाकोरचा काँग्रेसला 'राम राम'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |




अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गुजरात काँग्रेसचा युवा चेहरा अल्पेश ठाकोर यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. अल्पेश यांच्या जवळच्या सहकाऱ्याने ही माहिती दिली. अल्पेश हे गुजरातमधील ठाकोर समाजाचे नेतृत्व करत असून राधनपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

 

अल्पेश ठाकोर यांना लोकसभेचे तिकीट हवे होते, मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते पक्षावर नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मनाला जातो. अल्पेश भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

दरम्यान, आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत, ठाकोर समाजाच्या हक्कांसाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे अल्पेश ठाकोर यांनी सांगितले. मात्र, काँग्रेस पक्ष सोडण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@