'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटासाठी मार्ग मोकळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेला 'पीएम मोदी' या चित्रपटाविरुद्ध दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ६ एप्रिललाच देशभर प्रदर्शित होईल. लोकसभा निवडणूक आणि आचारसंहितेचा कारण देत ‘पीएम मोदी’ चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. हा चित्रपट निवडणुकीनंतर प्रदर्शित करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

 

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. रिपाइं (आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी ही याचिका दाखल केली होती.

 

आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शकरीत्या पार पडाव्यात यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. चित्रपटाला विरोध नाही, परंतु हा चित्रपट ऐन निवडणुकीच्या काळात प्रदर्शित करण्यात येत आहे. त्यामुळे त्यामुळे तो निवडणूक निकालानंतर प्रदर्शित करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने हे कारण ग्राह्य न मानता याचिका फेटाळली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@