हसीना पारकरच्या फ्लॅटचा १.८० कोटींना लिलाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019
Total Views |

 


मुंबई
: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्या नागपाडातील घराचा लिलाव सोमवारी करण्यात आला. केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) अंतर्गत नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील घराचा लिलाव करण्यात आला. गार्डन हॉलमधील हा फ्लॅट १ कोटी ८० लाखांना विकण्यात आला. २०१४ रोजी हसीनाच्या मृत्यूआधी हसीना याच फ्लॅटमध्ये राहत होती. देश सोडून फरार होण्याआधी कुख्यात गुंड दाऊद हा याच फ्लॅटमध्ये राहत होता. तसेच २०१४ रोजी हसीना पारकरच्या मृत्यूनंतर धाकटा भाऊ इक्‍बाल कासकर तेथे राहत होता. 


२०१७ मध्ये खंडणीप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने दाऊदचा भाऊ इक्‍बाल कासकरला याच घरातून अटक केली होती. सीबीआयने १९९७ साली दाऊदच्या या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. गार्डन हॉल अपार्टमेंट येथील फ्लॅटवर टाच आणल्यानंतर त्याच्या लिलावासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. तसेच लिलावासाठी १ कोटी ६९ लाख किंमत ठरविण्यात आली होती.

हसीना पारकरच्या या फ्लॅटचा लिलाव करण्याचे आदेश देण्यात आले होते. हसीना पारकरच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाने या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली. एप्रिल २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाऊदच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. दाऊदच्या कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका यावेळी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानुसार या घरावर टाच आणली असून पुढच्या कारवाईनुसार या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यात रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचा देखील सहभाग होता.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@