'जैश'च्या दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019
Total Views |


श्रीनगर : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी फैय्याज अहमद लोन याला दिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. फैय्याज जम्मू काश्मिरच्या कुपवाडा भागात राहणारा आहे. त्याच्यावर दोन लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले होते, त्याच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने अजामिनपत्र वॉरंटही घोषित करण्यात आले होते. २०१५ पासून दिल्ली पोलीस त्याच्या मागावर होते. २००७ मध्ये दिल्ली पोलीसांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. त्यावेळपासून लोन फरार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपही सुनावली आहे.

 

सोमवारी सकाळी पुलवामा भागातून सुरक्षादलांना दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत मोठे यश आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील लस्सीपोरा येथील ठिकाणाहून लष्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रसाठा व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.



सीमेवर पाकच्या कुरापती सुरूच

भारतीय वायुसेनेने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सीमाभागात नापाक कुरापती सुरूच आहेत. सीमाक्षेत्राचे उल्लंघन, राजौरी जिल्ह्यातील मुख्य चौक्यांना निशाणा करत अंधाधुंद गोळीबार रविवारी रात्रीपासून सुरूच आहे. पाकच्या सैन्याने शनिवारी पुंछ जिल्ह्यातील सैन्यदल ताफा आणि गावांवर हल्ला केला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




@@AUTHORINFO_V1@@