जुहू किनाऱ्यावर मृत समुद्री कासव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019
Total Views |


 


मुंबई : जुहू किनाऱ्यावर सोमवारी सकाळी समुद्री कासवांमधील 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या कासवाचे मृत शरीर वाहून आल्याचे निदर्शनास आले. शरीर कुजलेल्या अवस्थेत असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी किनाऱ्यावरच त्याची विल्हेवाट लावली. राज्याच्या सागरी परिक्षेत्रात 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीची कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. तर काही संख्येने 'ग्रीन सी' आणि 'लाॅगर हेड' प्रजातीच्या कासवांचा देखील वावर याठिकाणी आहे. सागरी कासवांमधील नरांचे दर्शन सहजा होत नाही. मात्र काही दिवसांपूर्वी मरिन ड्राइव्हच्या समुद्रकिनाऱ्यावर 'ग्रीन सी' प्रजातीचे नर कासवाचे मृत शरीर वाहून आले होते. शरीर सुस्थीतीत असल्याने वन विभागाच्या कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी त्याला पुरून ठेवले.

 

दरम्यान, सोमवारी सकाळी जुहू चौपाटीच्या किनाऱ्यावर मृत कासव आढळले. रविवारी सायंकाळीच या मृत शरीराचे दर्शन स्थानिकांना झाले होते. मात्र भरतीच्या पाण्याने हे शरीर वाहून गेले. सोमवारी सकाळी हे शरीर पुन्हा किनाऱ्यावर वाहून आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. हे शरीर 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या मादी कासवाचे असल्याची माहिती कांदळवन संरक्षण विभागाचे पश्चिम मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली. मोठ्या प्रमाणात कुजलेले असल्याने त्याची किनाऱ्यावरच विल्हेवाट लावल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या किनाऱ्यांवर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत दरवर्षी मोठ्य़ा संख्येने सागरी जीव जखमी किंवा मृत्यावस्थेत वाहून येतात.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@