नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची आम्हाला आधीच कल्पना होती : परराष्ट्र मंत्रालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
नवी दिल्ली : “लंडनमधील रस्त्यावर नीरव मोदी फिरताना दिसला म्हणजे त्याला लगेच भारतात आणू शकतो असे नाही.” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पीएनबी बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी गेल्या वर्षी भारतातून फरार झाला. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. “नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची आम्हाला आधीच कल्पना होती. नीरव मोदी लंडनमध्ये असल्यानेच आम्ही ब्रिटन सरकारकडे त्याच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केली होती. नीरव मोदी कॅमेऱ्याच दिसला म्हणजे त्याला लगेच भारतात आणू शकतो, असे नाही.” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
 
 
 

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी जितके प्रयत्न केले जात आहेत. तितकेच प्रयत्न नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठीही करण्यात येत आहेत. प्रत्यार्पणासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे भारताकडून ब्रिटन सरकारला सोपवण्यात आली असून ब्रिटन सरकारने भारताकडे कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केलेली नाही. ब्रिटन सरकारच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. अशी माहिती रवीश कुमार यांनी दिली. ‘द टेलिग्राफ’ या लंडनमधील वृत्तसंस्थेने नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचे वृत्त दिले. त्यामुळे नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@