एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी मेलेच नाहीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांवरील आत्मघाती हल्ल्यानंतर बालाकोट येथे भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. या मुद्द्यावरुन विरोधकांनी शंका उपस्थित केली होती आणि शनिवारी बोलताना राज ठाकरे यांनीही पुन्हा याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला. पण, त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बॉम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाहीत,” असा दावाच राज ठाकरे यांनी केला आहे. ते मनसेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

 

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. पितळ उघडे पडेल या भीतीने घटनास्थळी जाण्यास पाकिस्तानी मीडियाला पाकिस्तानी सेनेनेही बंदी घातली. पण, या परिस्थितीतही विरोधकांनी मोदींवर एअर स्ट्राईकचे राजकारण करत असल्याचा आरोप करुन टीकेची झोड उठवली. आता यामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही भर पडली आहे. तसेच, “सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेले हे सरकार लोकसभा निवडणुकांच्या काळात येत्या एक-दीड महिन्यामध्ये पुलवामासारखा अजून एक हल्ला घडवून आणेल, मग पुन्हा राष्ट्रभक्तीची भाषणे केली जातील. पुन्हा देशभक्तीचे वारे वाहतील. कारण, या सरकारने दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत,” असे राज ठाकरे म्हणाले.

 

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, त्यानंतर झालेला एअर स्ट्राईक, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने दाखवलेल्या देशभक्तीवर राज ठाकरे यांनी चौफेर टीका केली. पुलवामा हल्ल्यापूर्वी सीआरपीएफने केलेली विमान प्रवासाची विनंती फेटाळली गेल्याबाबतही राज ठाकरेंनी शंका उपस्थित केली. तसेच अजित डोवालांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी व्यक्तीच्या असलेल्या भागीदारीविषयी राज यांनी सवाल उपस्थित केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@