नीरव मोदीचा लंडनमध्ये मुक्त वावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
 

भारताविषयी प्रश्नावर म्हणाला ‘नो कमेंट्स’

 

लंडन : पीएनबी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. लंडनच्या रस्त्यांवर तो मुक्तपणे वावरताना दिसला. ‘द टेलिग्राफ’ या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसारित केले. नीरव मोदी हा लंडनमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचा दावा ‘द टेलिग्राफ’ने केला आहे.

 

१३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून नीरव मोदी गेल्या वर्षी भारतातून फरार झाला होता. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात इंटरपोलने नीरव मोदीच्या हस्ते रेड कॉर्नर नोटीस काढली. परंतु अद्याप नीरव मोदीचे प्रत्यार्पण करण्यात भारताला यश आलेले नाही. नीरव मोदी हा वेस्ट एंड लंडनमधील सेंटर पाँईट टॉवरमध्ये एका तीन बेडरुम फ्लॅटमध्ये राहत असल्याचे ‘द टेलिग्राफ’च्या वार्ताहराने म्हटले आहे. ‘द टेलिग्राफ’च्या वार्ताहराने लंडनच्या रस्त्यावर नीरव मोदीशी संवाद साधला. त्यावेळी त्याचा व्हिडिओ वार्ताहराने चित्रित केला. ‘द टेलिग्राफ’च्या वार्ताहराने भारतीय बँक घोटाळ्याविषयी प्रश्न विचारला असता ‘नो कमेंट्स’ असे उत्तर नीरव मोदीने दिले. वार्ताहराने आणखी काही प्रश्न विचारण्यापूर्वीच पुढे नीरव मोदीने तिथून काढता पाय घेतला आणि तो गाडीत बसून निघून गेला.

 
 
 

दरम्यान, नीरव मोदीची भारतातील सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अलिबाग येथे असेलला नीरव मोदीचा बंगला प्रशासनाने ताब्यात घेतला असून शुक्रवारी नियंत्रित स्फोटकांद्वारे जमीनदोस्त करण्यात आला. अलिबागच्या सुमद्रकिनारी असलेला हा बंगला सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आला आहे. हा बंगला स्फोटकांद्वारे अंशत: जमीनदोस्त करण्यात आला असून त्यासाठी बंगल्याच्या चारही बाजूने सुरुंग लावण्यात आला होता. येत्या १५ ते २० दिवसांत मशीनच्या साहाय्याने हा बंगाल पूर्णपणे पाडण्यात येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@