राज ठाकरेंची 'लोकसभा' भूमिका गुलदस्त्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2019
Total Views |



वर्धापनदिनी मनसैनिकांना आदेश मिळण्याची शक्यता

 
 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांमध्ये बऱ्याच घडामोडी घडत असताना मनसेच्या आघाडीवर मात्र अजूनही शांतता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जरी भाजप सरकारविरोधात ओरड कधीचीच सुरू केली असली तरी या लोकसभा निवडणूकीबाबतची भूमिका मात्र अजूनपर्यंत गुलदस्त्यात ठेवली आहे. निवडणूक लढवायची की नुसताच दुसऱ्यांचा प्रचार करायचा हेही न समजल्याने नेहमीप्रमाणे मनसैनिक बुचकळ्यात पडले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र काँग्रेसने मनसेला टोकाचा विरोध केल्याने मनसेला महाआघाडीच्या बाहेरच थांबावे लागल्याचे समजते. त्यात आता मनसेला लोकसभा निवडणूकच लढण्यात रस नसल्याची बातमी कोणीतरी पसरवली. सत्ताधाऱ्यांवर मनसे कडाडून टीका करेल मात्र लोकसभा निवडणुक लढवणार नाही, अशी विचित्र परिस्थिती समोर आल्याने मनसैनिक नाराज झाल्याचेही वृत्त आहे.

मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी निकराचे प्रयत्न सुरू केले होते. काँग्रेसच्या विरोधानंतरही राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील कल्याणची जागा मनसेला सोडण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे. मात्र मनसे लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नसून आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहितीदेखील मिळते आहे. येत्या शनिवारी ९ मार्चला मनसेच्या वर्धापनदिनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत बोलणार असल्याचे समजते. 

आमच्या पक्षाची भूमिका पक्षाध्यक्ष राज ठाकरेच ठरवत व जाहीर करत असतात. त्यामुळे अन्य कोणी काही बोललं तर त्याला काहीही अर्थ नाही. लोकसभा लढवायची अथवा नाही ते थोड्याच दिवसांत कळेल.

-संदीप देशपांडे, मनसे नेते

 



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 

@@AUTHORINFO_V1@@