भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने घेतली होती 'जैश'ची मदत; मुशर्रफ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. घात प्रतिघाताची शृंखला सुरूच आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने घेतली. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला. यामध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेचे अनेक दहशतवादी मारले गेले. परंतु आता पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लक्षरप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, "त्यांच्या काळात पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी मसूद आणि जैशसारख्या दहशतवादी संघटनेचा वापर केला होता."

 

बुधवारी पाकिस्तानच्या ‘हम न्यूज’ या वृत्तवाहिनीसाठी पाकिस्तानचे पत्रकार नदीम मलिक यांना मुशर्रफ मुलाखत देत होते. त्यावेळी त्यांनी ही खळबळजनक माहिती दिली. नुकतेच पाकिस्तानने ४४ दहशतवाद्यांना अटक केली, या निर्णयाचे मुशर्रफ यांनी स्वागत केले. त्यानंतर तुमच्या काळात अशी कारवाई का घडली नाही नाही? असा प्रश्न विचारला असता, "यावर माझ्याकडे काही ठोस कारण नाही. त्यावेळी भारत-पाकचे संबंध अजून खराब होते, दोन्ही राष्ट्रे एकमेकांवर कुरघोडी करत होती. यासाठी जैशसारखी दहशतवादी संघटना आम्हाला मदत करत होती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली नाही." असे मुशर्रफ यांनी सांगितले आहे.

 

मुशर्रफ यांच्यावर झालेला हल्ला देखील ‘जैश’नेच घडवला होता अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आमच्या देशात दहशतवादी नाहीत असे सांगणारा पाकिस्तान आता तोंडघशी पडला आहे. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीच जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आपल्या देशात असल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तानवरचा दबाव वाढल्याने पाकिस्तानने ४४ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे, यात मसूदच्या भावाचादेखील समावेश आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@