कश्मिरा मेवावाला यांची सीआयआय महाराष्ट्र स्टेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2019
Total Views |



 

मुंबई : सीआयआय महाराष्ट्र स्टेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदावर काश्मिरा मेवावाला यांची नियुक्ती करण्यात आली तर श्रीराम नारायण हे उपाध्यक्ष असणार आहेत. सीआयआय महाराष्ट्र स्टेट कॉन्सिलच्या दि. गुरुवारी झालेल्या वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

 

आपल्या ३४ वर्षांच्या अनुभवी कारकिर्दीत कश्मिरा यांनी टाटा समुहाच्या टाटा शेअर टीएसआरसाठी काम पाहिले आहे. भांडवली नियामक मंडळ सेबीच्या समितीवर त्या कायम आहेत. सीआयआय महाराष्ट्र स्टेट काऊन्सिलचे उपाध्यक्ष श्रीराम नारायण हे एन्डरेस प्लस हाऊस्टर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या नारायण यांनी व्यावसायिक व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आपल्या २९ वर्षांच्या अनुभवात उत्पादन क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@