स्वच्छतेत अंबरनाथ नगरपालिका राज्यात पाचवी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2019
Total Views |


 


ठाणे : देशभरात घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणात अंबरनाथ नगरपालिकेने राज्यात पाचवा तर देशात ३० वा क्रमांक पटकावला आहे. यामुळे पालिकेच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा देशाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत अंबरनाथ नगरपालिकेचा ६७ वा आणि राज्यात १४ वा क्रमांक आला होता.

 

सलग दुसऱ्या वर्षीही नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रिनिधींनी यंदा नागरी सहभागातून प्रभावी स्वच्छता मोहीम राबवली आणि स्वच्छतेबाबतचे महत्व नागरिकांना पटवून दिले, हागणदारीमुक्त अभियानांतर्गत स्वच्छतागृहे बांधण्याची व्यापक मोहीम राबवली होती. यामुळे नगरपालिकेने यंदा पाचवा क्रमांक पटकावला आहे. नगराध्यक्षा, सर्वपक्षीय लोप्रतिनिधी, अधिकारी, सफाई कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे नगरपालिकेने स्वच्छतेबाबाबत देशात आणि राज्यात सलग दुसऱ्या वर्षी यश मिळवले असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी सांगितले.

 

पालिका मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छतेसाठी मेहनत घेतली, लोकप्रतिनिधींनी प्रभागात स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले, तसेच ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करताना नागरिकांचेही योग्य सहकार्य मिळाल्याने यावर्षी अंबरनाथ नगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक आल्याची माहिती नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@